शिवसेना स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी करणार – खा. संजय राऊत

sanjay raut

जळगाव : स्वबळावर निवडणुका लढण्याची शिवसेना पदाधिका-यांची तयारी आहे. जळगाव दौ-यावर आलेले शिवसेनेचे खा. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांसमवेत संवाद साधत राऊत म्हणाले की जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची चांगली ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा लढवण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागणार आहोत.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर व रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राऊत म्हणाले की प्रशांत किशोर हे राजकीय नेते नाहीत. त्यांनी आमच्याप्रमाणेच कॉंग्रेससाठी सुद्धा काम केले आहे. ते व्यावसायिक राजनीतकार असून नेतेमंडळी त्यांची भेट घेत असल्यास ते त्यांच्या पक्षविस्तारासाठी भेटले असतील. हि भेट म्हणजे कोणतीही राजकीय घडामोड नसल्याचे खा. राऊत यांनी म्हटले आहे.

देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्रीतपणे सशक्त आघाडी तयार करण्याची गरज आहे. मात्र विरोधी पक्षाची आघाडी कॉंग्रेस पक्षाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. सद्यस्थितीत कॉंग्रेसची अवस्था कमकुवत आहे. तरी तो देशातील मुख्य विरोधी पक्ष आहे. काही राज्यात कॉंग्रेस प्रबळ आहे. त्यामुळे रा. कॉ. नेते शरद पवार, ममता बॅनर्जी, शिवसेनेचे सुप्रिमो उद्धव ठाकरे काही प्रयत्न करत असतील तर त्याचे परिणाम लवकरच दिसतील. कधी काळी म्हटले जात होते की शिवसेना मुंबई ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. मात्र आज आज कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. जो उत्तम रितीने मनपा चालवतो तो राज्यदेखील चालवू शकतो असे खा. संजय राऊत पुढे म्हणाले. मुंबई मनपा नंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र चालवत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here