विना परवाना मद्य विक्री – हॉटेल जस्ट चिलवर कारवाई

जळगाव : विना परवाना ग्राहकांना बसण्यासाठी टेबल खुर्ची व पिण्यासाठी विदेशी मद्य उपलब्ध करुन देणा-या हॉटेल मालकासह मॅनेजरवर एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. महामार्गावरील गोदावरी महाविद्यालयानजीक हॉटेल जस्ट चिल वर सदर कारवाई करण्यात आली आहे.

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट व बारमधे दुपारी चार ते नऊ वाजेच्या दरम्यान केवळ पार्सल सुविधा उपलब्ध ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. असे असतांना हॉटेल जस्ट चिल येथे रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना भोजनासह विदेशी मद्य प्राशनासाठी टेबल खुर्चीची सोय करुन दिली जात होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे 1 जुलैच्या रात्री नऊ वाजता पो.नि. शिकारे यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. ईमरान सैययद, पो. कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर, सुधीर साळवे यांच्या पथकाने याठिकाणी छापा घातला. याठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टेबल खुर्चीवर भोजनासह विदेशी मद्याचा आस्वाद घेतांना ग्राहक आढळून आले. याप्रकरणी हॉटेल मालक सचीन पांडुरंग मराठे (रा. खेडी – जळगाव) आणी मॅनेजर योगेश हरीभाऊ कर्डीले (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गु.र.न.456/21 म.दा.अधिनियम कलम 65 (ई) सह कलम भादवी कलम 188, 269 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांच्या कब्जातून विदेशी मद्याचा 6780 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here