स्वप्निलच्या आत्महत्येनंतर मंत्रीमंडळात झाली चर्चा

uddhav thackeray

मुंबई : एमपीएससी मायाजाल असल्याचे ही परिक्षा पास झालेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्येपुर्वी म्हटले आहे. चोवीस वर्षाच्या स्वप्निल लोणकर या तरुणाने काल पुण्यात आत्महत्या केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निवाडा करणा-या एमपीएससीचा कारभार केवळ दोन व्यक्ती बघत आहेत. सदस्यांची चार पदे दोन वर्षापासून रिक्त आहेत. एमपीएससीचा हा कारभार विद्यार्थ्यांच्या जिवावर उठला असल्याचे स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येतून दिसून आला आहे.

त्याच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. एमपीएससी परिक्षेबाबत राज्य सरकार समिती गठीत करणार आहे. ही समिती या परिक्षेबाबत अभ्यास करणार असून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. आत्महत्या करणा-या स्वप्नीलने एमपीएससीची मुख्य परिक्षा 2019 – 20 मधे पास केली होती. त्यानंतर ही परिक्षा प्रक्रिया रखडली. तोंडी परिक्षा दिड वर्षापासून झालीच नाही. त्यातच कोरोना व लॉकडाऊनमुळे बिघडलेली आर्थिक परिस्थिती असह्य झाल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली. स्वप्निलच्या म्हणण्यानुसार राज्यातील एमपीएससीचे मायाजाल जिवघेणे असल्याचे दिसून आले आहे. वेळखाऊ निवड प्रक्रियेमुळे तरुणांची उमेदीची वर्ष हातातून निघून जात आहे. एमपीएससीचा ढिसाळपणा या आत्महत्येच्या घटनेतून पुढे आला आहे. दरवर्षी लाखो तरुण ही परिक्षा देतात. मात्र भरली जाणारी पदे असतात केवळ चार ते पाच हजाराच्या घरात. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा व कोरोनामुळे होणारा विलंब या कारणामुळे या परिक्षा वेळेत झालेल्या नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here