एकनाथराव खडसे यांचे जावई ईडीच्या ताब्यात

माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना ईडीने ताब्यात घेत रात्रीच अटक केली आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी गिरीष चौधरी यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक झाली आहे. रा.कॉ. नेते एकनाथराव खडसे यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथराव खडसे महसूलमंत्री असतांच्या काळात पुणे येथील भोसरी येथे सुमारे तिन एकर जागा खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सन 2016 मधे झाला होता. या जमीनीचे बाजारमुल्य 31 कोटी रुपये असतांना ती जमीन केवळ 3.7 कोटी रुपयांना खरेदी विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकनर दराच्या तुलनेत अतिशय अल्प दराचे बाजारमुल्य दाखवून जमीनीचा व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
अब्बास उकानी यांच्या मालकीची ही जमीन होती. त्यांच्याकडून ती जागा एमआयडीसीने सन 1971 मध्ये अधिग्रहीत केली होती. मात्र उकानी यांना नुकसान भरपाईचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याचे म्हटले जात आहे. 12 एप्रिल 2016 रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीत ती जमीन उकानी यांना परत द्यावी की त्यांना जास्त रकमेची नुकसान भरपाई द्यावी याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते असा दावा केला जात आहे. उकानी यांनी ती जमीन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीष चौधरी यांना विक्री केल्याची बाब समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here