अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमिवर पद्मालय मंदीर बंद

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान अंगारकी चतुर्थीनिमित्त बंद राहणार आहे. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे. दि.27 जुलै रोजी अंगारका योग (मंगळकी चतुर्थी) येत आहे. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या -उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यां दोन्ही गणरायांना संबोधले जाते.

श्री गणेशजींच्या अंगारकी चतुर्थीला खान्देश परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. ग्रामीण भागासह शहरांतून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण येथे येत असतात.

मंगळकी चतुर्थीमुळे कटलरी, खाद्यपदार्थाच्या तात्पुरत्या हॉटेल्स, रसवंती, खेळण्यांची दुकाने येथे थाटली जातात. मात्र सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पद्मालय देवस्थान शासकीय नियमानुसार गेल्या काही दिवसांपासूनच बंदच आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला देवस्थान दर्शनासाठीदेखील बंदच राहणार आहे. भाविक भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नाही. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार यात्रा व मंदीर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदीर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here