अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सुरज चौधरी हा विद्यार्थी (94.50 टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर आनंद रांका 91.00 टक्के गुण मिळवून द्वितिय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. एकूण 30 विद्यार्थी यावेळी परीक्षेला बसले होते. अनुभूती स्कूलच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची नववी बॅच होती. या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेचे 05 तर कॉमर्स विभागाचे 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. स्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. सायन्स व कॉमर्स दोन्ही विद्या शाखेचे सर्वच विद्यार्थी विशेष प्रावीण्याचे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घरीच राहून अभ्यास केला. अभ्यासक्रम अवघड असून देखील अधिक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता परिक्षेतून सिद्ध केली आहे. अशा अवघड परिस्थितीत देखील प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष कायम होते, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आपला अभ्यास सातत्याने करतच होते. तरी देखील विद्यार्थी वर्गाने घवघवीत यश संपादन केले असल्याची प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासातच नव्हे तर अन्य उपक्रमांध्ये देखील सहभाग घेतला. स्वयंस्फूर्तपणे अभ्यासाचा ध्यास घेत विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी म्हटले आहे. या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना सदिच्छा दिल्या. अभ्यासाला अनुकूल वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले अशा शब्दात अनुभूती स्कूलचे वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव आणि प्राचार्य मनोज परमार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अनुभूती स्कूलमध्ये राशी चांबोळे-प्रथम – हर्षिल बोथरा-द्वितीय
जळगाव : येथील अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्ह या पद्धतीनुसार कु. राशी चांबोळे ही विद्यार्थिनी 95.40 टक्के गुण पटकावत शाळेत प्रथम आली आहे. तसेच हर्षिल बोथरा 95.20 टक्के गुण मिळवून व्दितीय आला आहे. अनुभूती स्कूलची अकरावी बॅच होती. दहावीसाठी यावेळी एकूण 46 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हर्षिल बोथरा आणि अनुज अग्रवाल या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित या विषय़ात 100 पैकी 100 गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य दाखवले आहे. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी म्हटले आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभवावर आधारीत या निवासी शाळेने आपले वेगळे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे व जपले आहे. फक्त अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि सरसतेचा ध्यास याठिकाणी घेतला जातो. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा पाईक व्हावे, चांगला नागरीक व्हावे यादृष्टीने अनुभूती शाळेच्या व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाही परंतु अंतर्गत गुणांच्या आधारे आणि बोर्डाने ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव तसेच प्राचार्य मनोज परमार व शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे. दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, गणित आणि शास्त्र या विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त केले आहेत, अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here