सोन्याच्या हॉलमार्किंगची मुदत वाढवा – व्यापाऱ्यांची मागणी

नवी दिल्ली : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सशी संलग्न असलेल्या ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनने केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्याशी संपर्क साधला आहे. जुन्या दागीन्यांचा स्टॉक ज्वेलर्सकडे ठेवण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. स्टॉकमध्ये हॉलमार्क मिळवण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवून मिळण्याची मागणी व्यापारी वर्गाने त्यांना केली.

देशभरातील मोठ्या संख्येने ज्वेलर्स आणि हॉलमार्किंग केंद्रांची अपुर्ण संख्या आणि जुन्या स्टॉकमधील प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क मिळवण्याच्या दृष्टीने या तारखेला मुदतवाढ मिळणे गरजेचे असल्याचे गोयल यांच्या निदर्शनास आणले गेले.

देशात जवळपास चार लाख इतक्या संख्येने ज्वेलर्स आहेत. त्यापैकी जवळजवळ 85 % ग्रामीण भागातील लहान ज्वेलर्स असून ते गावातून महानगरांपर्यंतच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी सर्वसामान्यांच्या गरजा पुर्ण करतात.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here