अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीचा जामीन फेटाळला

मुंबई : पॉर्न फिल्मसची निर्मीती व वितरण केल्याच्या आरोपाखाली सध्या अटकेतील व्यावसायीक तथा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळल्यामुळे राज कुंद्रा याची जेलमधून सुटका लांबणीवर पडली असून अडचणी वाढल्या आहेत.

पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती – वितरण केल्याप्रकरणी राज कुंद्रा यास तातडीने दिलासा देण्यास काल उच्च न्यायालयाकडून नकार मिळाला होता. सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या जामीन याचिका मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या आहेत.

अटकेबाबत राज कुंद्रा याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपिठाकडून पोलिसांना मिळाले होते. सध्या राज कुंद्रा चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. काल झालेल्या सुनावणीत राज कुंद्रा याच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी सदर अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नसून सीआरपीसी कलम 41 (ए) नुसार राज कुंद्रा यास नोटीस बजावणे आवश्यक होते असे सांगण्यात आले. त्यानंतरच अटक व्हायला हवी होती. मुख्य सरकारी वकील अरुणा पै – कामत यांनी सदरचा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरच कुंद्रा यांना अटक केली असल्याचे सरकारी वकील अरुणा पै- कामत यांनी म्हटले. या याचिकेवर सरकारी वकिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानए दिले. दरम्यान राज यास अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी विनंती अ‍ॅड. पौंडा यांनी न्यायालयाला केली होती.

सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी अंतरिम दिलासा मिळणार नसल्याचे न्या.गडकरी यांनी म्हटले होते. ज्या गोष्टी पोर्नोग्राफिक असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे त्या फिल्मसमध्ये थेट लैंगिक दृश्ये अथवा शारीरिक संबंध दर्शवण्यात आलेले नाही. लघुपटात दाखवली जातात तशी प्रणय दृष्य यात असून अशी दृश्ये बघणारा प्रेक्षकवर्ग फारतर कामातुर होऊ शकतो. माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 (ए) लावले जाऊ शकत नसल्याचे कुंद्रा यांच्या वकीलांकडून सांगण्यात आले. फारतर कलम 67 (कामातुर कंटेट प्रसिद्ध करणे) अंतर्गत कारवाई करता येऊ शकते असे याचिकेत नमुद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here