जबरी चोरी – घरफोडी करणारे एलसीबीच्या ताब्यात

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज घरफोडी करणा-या तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे. विशाल मुरलीधर दाभाडे, विशाल किशोर मराठे आणि अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार मात्र अद्याप फरार आहे. आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे असे फरार आरोपीचे नाव आहे.

रामेश्वर कॉलनीत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण काहीही कामधंदा न करता दररोज मद्यपान व मांसाहार करत मौजमजा करत असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागली होती. त्या माहितीच्या आधारे विशाल मुरलीधर दाभाडे यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत विशाल दाभाडे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. चौकशीत अधिक माहिती देतांना त्याने अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव आणि विशाल किशोर मराठे तसेच आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे या तिघांची नावे कबुल केली. यातील अभिषेक व विशाल मराठे या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. मात्र आकाश नागपुरे हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याच्या मागावर आहेत. विशाल दाभाडे व अभिषेक जाधव या दोघांवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ.प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, सुनिल दामोदरे, दादाभाऊ पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

दुस-या एका तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनचालकाचा मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यास अटक केली आहे. अक्षय उर्फ मॉडल मुकेश अटवाल (19) रा. चौगुले प्लॉट, शनिपेठ जळगाव असे त्याचे नाव आहे. त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 20 जून रोजी जळगाव शहरातील रोझ गाईन नुतन मराठा महाविद्यालय परिसरात धावत्या स्कुटीवर डबलसीट बसलेल्या दोघा अज्ञात इसमापैकी मागे बसलेल्या चोरट्याने दिपक वाल्मीक मोरे यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिराकावुन नेला होता. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, स.फौ.अशोक महाजन, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, प्रदीप पाटील. जयवंत चौधरी, संदीप साळवे, सुनिल दामादरे. दादाभाऊ पाटील. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी,नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी आदींच्या पथकाने अक्षय उर्फ मॉडल मुकेश अटवाल यास ताब्यात घेत अटक केली. सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे व मानेवर टॅटू गोंधलेला इसम या वर्णनाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने आपण हा गुन्हा केल्याचे अक्षय याने कबुल केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here