औषध घ्यायला गेले आजोबा चोरट्यांनी पैशांवर मारला डल्ला

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे बाजारात गर्दी झाली उसळली आहे. त्याचा फटका भालेराव नामक पेन्शनरांना बसला.जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेले जगन्नाथ भालेराव हे नवी पेठेतील जिल्हा बॅकेत पेन्शन घ्यायला गेले होते.

बॅँकेतून पेन्शनची रक्कम काढल्यानंतर ते मेडिकलवर औषध घ्यायला गेले. त्यांच्या पिशवीतून ११ हजार रुपये लांबविण्यात आले. त्यांनी बँकेतून १३ हजार रुपये काढले होते.त्यातील दोन हजार त्यांनी बाजुला काढून ११ हजार रुपये पिशवीत ठेवले.

त्यानंतर ते दाणा बाजारात मेडिकल दुकानावर गेले.औषधी घेतल्यानंतर पिशवीतील ११ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.मेडिकलवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांच्यामागे दोन महिला संशयास्पद अवस्थेत दिसून आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here