पोलिसांना 12 तास ड्युटी 24 तास आराम?

मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी एक महत्वाची घोषणा केली असून त्यावर निर्णय मात्र अपेक्षीत आहे. पोलिसांनी 12 तास ड्युटी केल्यानंतर त्यांना 24 तास आराम मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे संजय पांडे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात सध्या बदल्या आणि बढत्या या विषयावर चर्चा सुरु आहे. याबाबत लवकरच आदेश निघणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील पोलिसांच्या समस्या समजून व ऐकून घेतल्या. सलग 12 तास ड्युटीच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढण्याचे ठरवले आहे. याप्रश्नी लवकरच 12 तास ड्युटी व 24 तास आराम याविषयी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोविड परिस्थिती लक्षात घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अधिका-यांशी संवाद साधला. अनेक अधिका-यांनी फेसबुक लाइव्हमध्ये थेट आपल्या समस्या कमेंट बॉक्समधून त्यांच्यापुढे मांडल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना संजय पांडे यांनी पोलिसांच्या प्रलंबित प्रश्नावर भाष्य करत एक चांगली वार्ता दिली. पोलिसांना वाढीव कामामुळे ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्यावर पांडे म्हणाले की पोलिसांना 12 तास ड्युटी केल्यानंतर 24 तास आराम मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here