रंगकाम करणारा निघाला चोरटा – साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

On: November 28, 2026 3:10 PM

जळगाव : रंगकाम करत असतांना चोरी करणा-या रंगा-यास त्याच्या कब्जातील रोख रकमेसह एकुण 3 लाख 45 हजार रुपये किमतीचा सोन्या चांदीच्या वस्तूंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रंगा-यास अटक करण्यात आली आहे. गोकुळ सुरेश बागळे असे अटक करण्यात आलेल्या रंगा-याचे नाव आहे.

नवीन जोशी कॉलनी भागातील एका घरात गोकुळ बागळे हा रंगारी रंगकाम करत होता. रंगकाम करत असतांना त्याने रंगकाम सुरु असलेल्या घरातून सोन्या चांदीच्या विविध वस्तू गायब केल्या. हा प्रकार घर मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, पो. कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे व सुभाष साबळे आदींनी या गुन्ह्याचा तपास केला. या गुन्ह्याचा अधिक तपास हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment