तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना साडेसात वर्ष कारावास

जळगाव : गावातील मुलींची छेडखानी करतो या एकमेव संशयावरुन झालेल्या मारहाणीमुळे मृत्युस कारणीभुत ठरलेल्या तिघांना साडेसात वर्षाचा कारावास सुनावण्यात आला आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायधिश (4) एस.जी.ठुबे यांनी आज 14 ऑगस्ट रोजी सदर निकाल दिला आहे.

जळगाव तालुक्यातील जळके येथील राजेंद्र देवराम सुरवाडे हा गावातील मुलींकडे बघतो व त्यांची छेडखानी करतो या संशयाच्या आधारे त्याला गावातील आरोपी आबा अर्जुन सोनवणे, सुपडू रामकोर सोनवणे व देवा उर्फ देवराम धनराज भिल या तिघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमुळे त्याच्या पोटात जबर इजा झाली होती. आपल्याला अजून मारहाण होईल या भितीपोटी जखमी राजेंद्र रात्रभर गावातील मंदीरात लपून बसला होता. त्यानंतर तो गुपचूप जळगाव येथे आला होता. वैद्यकीय उपचार घेण्याकामी तो जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. उपचार घेत असतांना त्याने घडलेल्या हकिकतीनुसार एमआयडीसी पोलिसांना रितसर जवाब दिला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

yogesh shinde psi investigation officer

या प्रकरणी त्याचे वडील देवराम सखाराम सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 185/18 भा.द.वि. 302, 504 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे व पो.नि. सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक योगेश बाबासाहेब शिंदे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली होती.

या खटल्यात एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांमधे मयताचे वडील, वैद्यकीय अधिकारी व पोलिस तपास अधिकारी योगेश शिंदे यांची साक्ष महत्वाची ठरली. भा.द.वि. 304 (2) मधे दोषी धरत तिघा आरोपींना साडेसात वर्ष कारावास व प्रत्येकी तिस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दिड वर्ष कारावास सुनावण्यात आला.  भा.द.वि. 323 नुसार तिघांना दोषी धरण्यात येवून सहा महिने साधी कैद व पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने कैद सुनावण्यात आली. भा.द.वि. 506 नुसार एक वर्ष कारावास व एकहजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय  मयत राजेंद्र सुरवाडे याच्या नातेवाईकांना 75 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार तुषार फकीरा मिस्तरी यांनी कामकाज पाहिले. तसेच सरकारी वकील अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी सरकारच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहिले.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here