कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

जळगाव – भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा आज (ता.6) स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार जाता-येता डोळ्यांसमोर असावे, यासाठी भूमिपूत्राने घराच्या दर्शनी भागावर भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचे फलक अनावरण केले.

धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे त्या भूमिपूत्राचे नाव आहे. फलक अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सौ.सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील, सौ.मंडाबाई पाटील, डॉ. पुरूषोत्तम बी पाटील, सबवेअर डॉ. अशोक पाटील, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, चंपालाल पाटील,भगवान पाटील, वसंत पाटील, नवल दोधू पाटील, जे.डी.आर्ट यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती आणि गायींचे संगोपनाचे महत्त्व सांगतांना प्रभाकर पाटील भवरलालजी जैन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘दहावी पास झालो त्यावेळेस वडिल गंगाधर पाटील सालदारकी करायचे, वडिलांकडे 22 गुंठे जमीन तिही नापिक होती. त्यामुळे रोजगारासाठी जैन पाईपमध्ये लागलो. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांच्या नेतृत्व गुणांमुळे प्रभावित झालो. मोठ्याभाऊंचे ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केले तर देशाच्या विकास होतो’असे प्रेरणा देणाऱ्या विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेतुनच ‘ मुक्ताई’ हे देशी गायीचे संगोपन केलेले उत्पादन सुरू केले. यामध्ये देशी गायीचे दुध, तुप, ताक, अग्निहोत्र साठी लागणाऱ्या गौ-या, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेण आणि लाकुड मिश्रण करून एका विशिष्ट पध्दतीने गौ-या तयार केल्या जातात. यातुन महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे प्रभाकर पाटील सांगतात. प्रत्येक घरात देशी गाय असावी यासाठी ते प्रयत्न करतात. दुध संकलनातुन शेतकऱ्यांना हमी भाव देत ‘मुक्ताई’ हे सतखेडा गावातील उत्पादन मोठ्या शहरांमध्ये पोहोचवतात. हे सर्व कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाल्याचे प्रभाकर पाटील गौरवाने सांगतात. भवरलालजी जैन यांचे समाज घडविणारे विचार मला व माझ्या पुढच्या पिढीच्या कायम स्मरणात रहावे व गावातील तरूणांना वेगळे काही करणाची ऊर्जा देत रहावे यासाठी घराच्या दर्शनी भागावर कायमस्वरूपी फलक लावल्याचे प्रभाकर पाटील अभिमानाने सांगतात.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here