राजकुमारीसोबत संपतने संबंध केले पुन्हा पुन्हा! लग्नास मिळता नकार, बलात्काराचा झाला गुन्हा!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी राजकुमारीला (काल्पनिक नाव) उस्मानाबादच्या एका नर्सिंग महाविद्यालयात लेक्चररचा जॉब मिळाला होता. बीड जिल्ह्याची रहिवासी असलेली राजकुमारी दिसायला देखणी आणि बोलकी असल्यामुळे तिचा महाविद्यालयात चांगला प्रभाव होता. तिची उत्कृष्ट वक्तृत्व शैली लक्षात घेत महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकामी तिला मिरज येथे पाठवले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेत ती मिरज येथील एका सुसज्ज अशा दवाखान्यात गेली होती. तिच्या अख्त्यारीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले.

ज्या रुग्णालयात ती विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रशिक्षण देण्यासाठी आली होती त्या ठिकाणी संपत लक्ष्मण मल्हाड हा तरुण नेहमी ये – जा करत होता. त्या रुग्णालयात त्याचे नेहमी येणे जाणे असल्यामुळे त्याची व राजकुमारीची ओळख झाली. तो सन 2016 चा काळ होता. त्यावेळी राजकुमारी तेवीस वर्षाची होती. संपत लक्ष्मण मल्हाड हा तरुण सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दरिबडची या गावचा रहिवासी होता. राजकुमारी आणि संपत दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे साहजीकच दोघांची ओळख होण्यास वेळ लागला नाही.   

दरम्यानच्या कालावधीत राजकुमारी व संपत या दोघांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली. दोघेही तरुण आणि समविचारी असल्यामुळे दोघांच्या मनाच्या तारा जुळण्यास देखील वेळ लागला नाही. राजकुमारीला राहण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक स्वतंत्र खोली दिली होती. एके दिवशी संपत थेट तिच्या खासगी खोलीत रात्रीच्या वेळी तिला भेटण्यासाठी आला. ती वेळ आणि तिच्या ताब्यातील खोली दोन्ही राजकुमारीच्या  खासगी बाबी होत्या. मात्र असे असले तरी सर्व संकेत मोडून संपत तिच्या भेटीसाठी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आला. तु मला खुप आवडतेस असे म्हणत तो तिच्यासोबत लगट करु लागला. बघता बघता संधी साधत तिचे मन वळवून तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवत त्याने नको ते कृत्य केले. आपला कार्यभाग साध्य झाल्यानंतर तो गुपचुप तेथून निघून गेला.  

त्यानंतर काही दिवसांनी राजकुमारीचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आटोपले. ती आपल्या महाविद्यालयात नियमीत तासिका घेण्यासाठी परत आली. तरीदेखील दोघांचे मोबाईलवर नियमीत बोलण्याच्या क्रम चुकला नाही. तो तिला लग्न करण्याचे आमिष देतच होता. त्यानंतर सन 2017 मधे तो भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीला लागला.

संपतने तिला त्याच्या रुमवर वेळोवेळी बोलावून लग्नाचे आमिष दाखवत गोड बोलून सामाजिक बंधने झुगारुन तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या कालावधीत त्याने तिचा विश्वास संपादन केला होता. या विश्वासाचा फायदा घेत त्याने तिच्याकडून पैशांची मागणी देखील केली. तिने देखील त्याला वेळोवेळी पैसे दिले. त्याने गोड बोलून तिच्याकडून पैसे घेतले व त्यासोबतच समाजाला मान्य नसलेले विवाहबाह्य संबंध देखील प्रस्थापित केले. तो वेळोवेळी तिला लग्नाचे आमीष दाखवत तिच्याकडून सुख लुटत होता.

त्यानंतर कॅलेंडरची बरीच पाने उलटली व  काळ पुढे सरकला. सन 2018 मध्ये संपतला जळगाव सामान्य रुग्णाल्यात नोकरी मिळाली. त्याच कालावधीत राजकुमारीला देखील पुणे येथे अधिकारी पदावर नविन नोकरी मिळाली. खास तिला भेटण्यासाठी संपत पुणे येथे जात होता. तिला लग्नाचे आमिष दाखवत एका लॉजवर तो तिच्यासोबत समाजाला मान्य नसलेले संबंध ठेवत होता. जोडीला तो तिला लग्नाचे आमिष दाखवण्यास विसरत नव्हता. हा प्रकार बरेच दिवस सुरु होता. विविध कारण पुढे करत तो तिच्याकडून पैसे देखील घेत होता.

बघता बघता काळ पुढे पुढे सरकतच होता. काळ कुणासाठी थांबत नसतो. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. एकवेळ मनुष्य एखाद्या कामाचा कंटाळा करतो मात्र निसर्ग कधीच कंटाळा करत नाही. योग्य वेळ आल्यावर निसर्ग मनुष्याला त्याच्या कामाची पावती दिल्याशिवाय रहात नाही. सन 2019 मधे राजकुमारीला दिवस गेले. ती गर्भवती राहिली. आपल्या पोटात संपतचे बाळ असल्याचे तिने त्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता तरी तो लवकर आपल्यासोबत लग्न करेल अशी आशा राजकुमारी मनाशी बाळगून होती. मात्र त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास थेट नकारच दिला. त्याचे बोलणे ऐकून राजकुमारी त्याच्यावर चिडली. मी तुझ्या आईवडीलांना सर्व प्रकारचे सत्य कथन करणार आहे अशी तंबी तिने त्याला दिली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्याने तिला पुण्याहून जळगावला बोलावून घेतले. आपण लवकरच लग्न करु असे नेहमीप्रमाणे आमिष दाखवत गोड बोलून त्याने जळगाव नजीक असलेल्या एका दवाखान्यात तिचा गर्भपात करुन घेतला.

वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून राजकुमारीचे संपतसोबत असलेले संबंध तिच्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत सुरु होते. आपल्याला लग्न करायचे आहे, त्यासाठी घराचे काम करायचे आहे असे म्हणत त्याने तिला जळगावला बोलावून घेतले. ती जळगावला आल्यानंतर त्याने तिच्याकडून गोड बोलून वेळोवेळी पस्तीस हजार व सत्तर हजार रुपये घेतले. आपल्याला त्याच्यासोबत लग्नच करायचे आहे असे समजून तिने देखील त्याला वेळोवेळी पैसे दिले.

मात्र मार्च 2020 मधे त्याने दुस-याच तरुणीसोबत लग्न केल्याचे तिला समजले. त्याने परस्पर दुस-या तरुणीसोबत लग्न केल्याचे समजल्यानंतर राजकुमारीला धक्काच बसला. त्यामुळे तिने त्याच्यापासून चार हात लांब राहणे पसंत केले. मात्र त्याने तिला त्रास देणे बंद केले नाही. तो तिची भेट घेण्यासाठी तिला सतत फोन करु लागला. मात्र ती त्याला टाळत होती.

सप्टेंबर 2020 मध्ये त्याने तिला औरंगाबाद येथे बोलावले. आपण जर त्याला भेटण्यासाठी गेले नाही तर तो आपल्या गावात येवून आपली बदनामी करेन अशी राजकुमारीला भिती वाटत होती. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी औरंगबादला गेली. तु मला हवी आहे, तु कुणासोबतही लग्न करु नको अशी धमकी देत त्याने तिच्यासोबत पुन्हा संबंध केले. तुझ्या गावी येऊन तुला मारहान करेन अशी धमकी त्याने तिला दिली. त्याच्या धमकीला घाबरुन ती त्याला भेटत होती. जळगाव येथे एका परिचिताच्या घरी तिला नेवून तिचे हातपाय बांधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. ती पोलिस स्टेशनला जावू नये म्हणून त्याने तिला तिच्या गावी खासगी वाहनाने नेवून सोडले.

भेदरलेल्या राजकुमारीने हा सर्व प्रकार घरातील सदस्यांना कथन केला. त्यांनी तिला धीर देत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास सांगितले. घरातील आईवडील व भावाने धिर दिल्याने तिचा जिव भांड्यात पडला. तिने जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत जळगाव सामान्य रुग्णालयात नोकरीला असलेल्या  संपत लक्ष्मण मल्हाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 653/21 भा.द.वि. 376, 506 नुसार दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे सहकारी हे.कॉ. सनी सोनार व प्रदीप पाटील करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे राजकुमारी हे नाव काल्पनिक आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here