पाटबंधारे विश्रामगृहाच्या अतिक्रमणाचा महामार्गाला अडथळा

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाच्या समोर तापी पाटबंधारे महामंडळाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दक्षीणेकडील भागाकडे साठ मिटर रुंद राष्ट्रीय महामार्गाची हद्द आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत दोन्ही बाजूने 9 मिटर रुंदीचा सर्व्हिस रोड आहे. सध्या महामार्गाच्या रुंदीकरण व नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरेकडील प्रस्तावित 9 मिटर सर्व्हिस रोडमधे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या विश्रामगृह कुंपणभिंतीचेव अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली. त्यात सदर अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहे.

या कुंपणभिंतीच्या अतिक्रमणामुळे जळगांव महानगरपालिका अथवा राष्ट्रीय महामार्गाकडून सर्व्हिस रोड विकसीत होऊ शकत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जळगाव शहराच्या मंजुर विकास योजनेत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवामार्गाचा अंतर्भाव असल्याचे दर्शवण्यात आल्याचे म्हटले आहे. विकास योजनेची अंमलबजावणी करणे हे स्थानिक प्राधिकरणाच्या रुपात जळगाव महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सदर अतिक्रमण काढण्याची जबाबदारी देखील महानगरपालिकेची असल्याचे म्हटले जात आहे.

सन 1972 मधे राष्ट्रीय महामार्गाचे संपादन करण्यात आले आहे. सुमारे दहा ते बारा वर्षापुर्वीपासून या जागेवर तापी पाटबंधारे विभागाच्या कुंपणभिंतीने कब्जा केला आहे. कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याची तरतुद असून ते अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र दिले आहे.

या अतिक्रमीत जागेवर मुख्य चौफुलीवर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या अंतर्गत मोठे सर्कल करण्याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण न काढल्यास सर्कलची आखणी मध्यभागी न होता ती स्थलांतरीत केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऐन वर्दळीच्या जागी अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रकार सुरु होईल. सदर अतिक्रमण तातडीने काढण्याची मागणी दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here