लखीमपूर खेरी प्रकरणी आंदोलन, निदर्शने व निवेदन

जळगाव – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणारे चौघे शेतकरी भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याखाली चिरडून ठार झाले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करण्यासह किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत गेल्या दहा महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहेत.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनी व समर्थकांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या घटनेप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने सबंध देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करणारी आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्हाधिका-यांना या घटनेचा निषेध करणारे निवेदन आज देण्यात आले.आपल्या कॉर्पोरेट साथीदारांना शेतीचे संपूर्ण क्षेत्र नफा कमावण्यासाठी व अनिर्बंध मक्तेदारी निर्माण करण्यासाठी बहाल करण्याच्या अत्यंत कुटील हेतूने केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. आपल्या कॉर्पोरेट भागीदारांना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ने अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरु ठेवले असून यापुढे आंदोलन अधिक तीव्र करणार आहे. जोपर्यंत हे तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जात नाहीत व शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी किफायतशीर आधार भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा केंद्र सरकार करत नाही तोपर्यंत लढा सनदशीर मार्गाने सुरु ठेवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, शिवसेनेचे विष्णू भंगाळे, समाजवादी पार्टीचे रईस बागवान, काँग्रेसचे जमील शेख, मौलाना आझाद विचार मंचचे उपाध्यक्ष, करीम सालार , राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज मलिक , रामधन पाटील ,प्रा.सुनील गरूड , सोमनाथ माळी, भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे , लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे , पन्नालाल मावळे, राजेंद्र चव्हाण , नारीशक्ती ग्रुपच्या मनीषा पाटील , मंगला बारी , युवा सेना प्रमुख शिवराज पाटील ,महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा चे भारत ससाणे, दिलीप सपकाळे, आकाश सपकाळे , लोकसंघर्ष मोर्चा चे युवक अध्यक्ष भरत कर्डीले ,सागर पाटील , विवेक महाजन , विराज बनीट, कैलास मोरे, गोलू पवार , संजय पवार , कैलास पाटील, सुभाष पवार , वाल्मीक पवार, फाईम पटेल, अल्ताफ शेख, अजय पावरा, सुमित साळुंखे, सिद्धार्थ शिरसाठ, मनोज पाटील , गोलू पाटील, तेजस्विता पाटील,सुप्रिया पाटील आदी नेते व कार्यकर्ते हजर होते

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here