कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी

पाचोरा (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधील शेतकर्‍यांना चिरडले गेल्याने त्यांच्या परीवाराचे सांत्वन करण्यासाठी जात असतांना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ पाचोरा शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.

शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून उत्तर प्रदेश च्या लखीमपुर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चार शेतकर्‍यांना चिरडले. यात शहीद झालेल्या शेतकरी परीवाराचे सांत्वन करण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली असून या भाजपाच्या योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली.
या निदर्शनात ” योगी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी” ” जो किसान से टकरायेगा वह मिट्टी में मिल जायेगा”, प्रियंकाजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे” अशा अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला होता.

यावेळी शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण यांच्यासह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अ‍ॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अ‍ॅड. मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रांताधिकारी कार्यालय अव्वल कारकुन रमेश मोरे यांना निवेदन देण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here