11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावी शेतक-यांना चिरडून टाकण्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

माणूसकीला काळीमा फासणा-या या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंदमधे सहबभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी राहीली असल्याचे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 11 ऑक्टोबर रोजी बंददरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here