जळगाव जिल्हा कॉंग्रेस अध्यपदी प्रदीप पवार

जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी प्रदीप पवार यांची निवड झाली असून जिल्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. प्रदिप पवार यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील कॉंग्रेस भवनात ढोल ताशे लावून जल्लोष करण्यात आला. तसेच भडगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशाने तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सहमतीने प्रदीप पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे.

कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदी प्रदिप पवार यांच्या निवडीबद्दल सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, माजी पंचायत समिती सभापती इस्माईल शेख फकीरा, सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, उपाध्यक्ष रतीलाल महाजन, अल्पसंख्याक उपाध्यक्ष याकुब पठाण, तालुका अध्यक्ष कमर अली पटवे आदींनी प्रदीप पवार यांचे अभिनंदन केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here