माजी मंत्री देवकर यांचा जिल्हा बँकेसाठी अर्ज

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी इतर सहकारी संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. इतर सहकारी संस्था मतदार संघातून यापूर्वी रा.कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष व सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील तसेच पाचोरा येथील प्रकाश पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

21 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. गुलाबराव देवकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सुनील बिडवई यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांचे समवेत अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, राष्ट्रवादीचे सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here