बाबा राम रहिम यास आजन्म कारावास

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना राम रहिम सेवादार रणजीतसिंह यांच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबा राम रहिम यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तसेच बाबा राम रहिम यांना 31 लाख तर इतर चौघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने सुनावला आहे.

8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त असून या जिल्ह्यात जमावबंदीचे कलम देखील जारी करण्यात आले आहे. आपल्या दोघा अनुयांयीवर बलात्कार केल्याप्रकरणी बाबा राम रहिम सध्या विस वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here