चार हजाराची मागणी लिपीक एसीबीच्या चरणी

जळगाव : सदनिका खरेदीसाठी उप निबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयाकडून नाहरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी या कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास भोवली आहे. विनोद रमेश सोनवणे असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदारास जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील रुद्र गृहनिर्माण सहकारी संस्थेत असलेली सदनिका खरेदी करायची होती. या सदनिका खरेदीकामी त्यांना उप निबंधक, सहकारी संस्था,जळगाव कार्यालयाकडील ना-हरकत दाखल्याची आवश्यकता होती. सदर नाहरकत पत्र देण्याच्या मोबदल्यात या कनिष्ठ लिपीक विनोद सोनवणे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने तडजोडीअंती चार हजार रुपये तरी लागतील अशी मागणी केली. या प्रकरणी मागणी केल्याचे एसीबीला दिसून आले. त्यामुळे लिपीक विनोद सोनवणे यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत पाटील, पोलीस उप अधीक्षक, एसीबी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here