कैलास हटकर याच्या जुगार अड्ड्यावर छापा

जळगाव : जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात कल्याण मटका जुगारावर काल रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश दौलत महाजन (36) हरीविठ्ठलनगर जळगाव, संतोष विटट्ल भोई (38) रा. हरीविट्टनगर जळगाव, मुकेश चरणदास राठोड (30) रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, अशोक रामदास सोनार (63) रा हरीविठ्ठनगर जळगाव, शंकर वेडु भोई रा.हरीविठ्ठलनगर जळगाव, शिवा राजधर मिस्तरी (45)रा. हरीविठ्ठनगर जळगाव, गणेश गुरुमुख पवार (35) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, रमेश पुंडलिक जगताप (53) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, धनराज सिताराम पाटील (67) रा.खंडेराव नगर शिंपीगल्ली जळगाव, रविंद्र अमृत बोरसे (42)रा हरीविठ्ठनगर स्टॉपजवळ जळगाव अशी अटकेतील दहा जणांची नावे आहेत.

कैलास बुधा हटकर रा. हरीविठ्ठलगर यांच्या सांगण्यावरुन हा जुगार सुरु असल्याचे ताब्यातील सर्वांनी सांगितले. कैलास हटकर सध्या फरार आहे.
अटकेतील सर्वांकडून सट्टा जुगाराचे साहित्य आणि 4730 रुपये हस्तगत करण्यात आले आहे.

पो.कॉ.अजय सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामदास वाकोडे यांच्यासह स.पो.नि.शिंदे, स.पो.नि. संदीप परदेशी, उप निरीक्षक देशमुख, प्रवीण जगदाळे, पो.कॉ. अजय सपकाळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here