माजी मंत्री, आमदारांना जिल्हा बॅंक निवडणूक बंदीची मागणी

जळगाव : जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी माजी मंत्री, विद्यमान आमदार – खासदार, नगरसेवक यांच्या जळगाव जिल्हा सहकारी बॅंक संचालक मंडळ निवडणूकीत सहभाग घेण्यास हरकत घेतली आहे. त्यासाठी त्यांनी रिझर्व बॅंकेच्या एका परिपत्रकाचा संदर्भ घेतला आहे.

या पत्रकानुसार माजी मंत्री, विद्यमना आमदार – खासदार यांना लोकप्रतिनिधी पदावर राहिल्याने ही निवडणूक लढवता येणार नाही असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. या पत्रकाचा हवाला देत त्यांनी जिल्हा सहकारी बॅंक निवडणूक निर्णय अधिका-यांकडे हरकत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, विद्यमान आमदार किशोर पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, पारोळ्याचे आमदार चिमनराव पाटील, पारोळा कृ.उ.बा.समितीचे सदस्य अमोल पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, पारोळा येथील नगरसेवक करण पवार अशा एकुण चौदा लोकप्रतिनिधींचे अर्ज धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मात्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्यांचे अर्ज पळवाट काढून मंजूर केल्यास दिपककुमार गुप्ता हे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार असल्याचे म्हटले जात आहे. हा वाद उच्च न्यायालयात जाण्यापुर्वीच या लोकप्रतिनिधींचे अर्ज अवैध ठरण्याची जिल्ह्यात प्रतिक्षा होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here