उपोषणस्थळी माजी आमदार राजेंद्र जैन यांची भेट

गोंदीया (अनमोल पटले) : सरपंच संघटनेचे अध्यक्ष नितेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सेवा महासंघाचे विविध मागण्यांसाठी तिरोडा येथे आंदोलन सुरु आहे. पंचायत समितीच्या पटांगणावर सुरु असलेल्या या आंदोलन स्थळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी भेट दिली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुल योजनेत ज्यांचे नाव समाविष्ट झाले नाहीत त्यांच्या नावाचा समावेश करणे, प्रपत्र “ड” चे पोर्टल सुरु करणे, रोजगार हमी योजनेतील कुशल कामाचे देयके त्वरीत देणे व शेतकर्‍यांच्या विविध मागण्यां अशा लोकहितकारी मागण्यांसाठी सदर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीचे सरपंच सहभागी झाले आहेत. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासमवेत या भेटीप्रसंगी जिब्राईलखान पठाण, अजय गौर, डॉ.अविनाश जायस्वाल, प्रभु असाटी, नरेश कुंभारे, बबलु ठाकुर, राजु एन जैन, राजेश गुणेरिया, विजय बुराडे, जगदीश कटरे, प्रशांत डहाटे व सरपंच महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here