लाच घेणार नसल्याची शपथ सकाळी!———- पाच हजारांच्या सापळ्यात सायंकाळी!!

कोल्हापूर : लाच लुचपत विभागाच्या वतीने राज्यात सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह सुरु आहे. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत या सप्ताहाच्या अंतर्गत लाचखोरीला आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. या शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून विविध शासकीय कार्यालयात लाच प्रकाराला विरोध करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून लाच घेणार नसल्याबाबत शपथ घेतली जाते. मात्र असे असले तरी लाच घेण्याचा व मागण्याचा प्रकार थांबत नसल्याचे दिसून येते. राज्याच्या विविध ठिकाणी लाच घेण्याचे प्रकार या कालावधीत घडत आहेत. असाच एक प्रकार कोल्हापूरात घडला. सकाळी प्रतिज्ञा घेतल्यानंतर सायंकाळीच कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस स्टेशनला पाच हजार रुपयांची लाच घेतांना ठाणे अंमलदार पकडला गेला.

सागर इराप्पा कोळी (46) असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या ठाणे अंमलदाराचे नाव आहे. सागर इराप्पा कोळी या ठाणे अंमलदारास एसीबीचे पोलिस उप अधिक्षक आदीनाथ बुधवंत व त्यांच्या सहका-यांनी लाच घेतांना रंगेहाथ पकडले. वादातील कार परत मिळवून देण्याकामी लाचेच्या स्वरुपात तक्रारदाराकडे ठाणे अंमलदाराने पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदारास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून मदत घेतली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here