दहा रुपयांसाठी हत्या करणारे दोघे अटक

मलकापूर : दारु पिण्यासाठी दहा रुपये दिले नसल्याच्या किरकोळ कारणावरुन मित्राची हत्या करणा-या दोघा तरुणांना मलकापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. भागवत सिताराम फासे (55) रा. हिंगणा काझी असे हत्या झालेल्या तरुणाचे तर विनोद लक्ष्मण वानखेडे (40), दिलीप त्र्यंबक बोदडे (35) दोघे रा. सुभाषचंद्र बोस नगर मलकापूर असे अटकेतील दोघा तरुणांचे नाव आहे.

मुक्ताईनगर रस्त्यालगत असलेल्या मद्याच्या दुकानाजवळ 27 ऑक्टोबरच्या दुपारी भागवत फासे, विनोद वानखेडे व दिलीप बोदडे असे तिघे मित्र दारु पिण्यास गेले होते. यातील विनोद व दिलीप या दोघांनी भागवत कडे दारु पिण्यासाठी दहा रुपयांची मागणी केली होती. मात्र भागवतने नकार दिला. त्याचा नकार ऐकून राग आलेल्या दोघांनी लाकडी राफ्टर मारुन भागवत यास जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मलकापूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. प्रल्हाद काटकर व त्यांच्या सहका-यांनी दोघा फरार झालेल्या आरोपींना अटक केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here