पोलिसाला धक्काबुक्की करणा-यास न्यायालयाचा दिलासा

औरंगाबाद : पोलिसाचा गळा दाबून धक्काबुक्की करणा-या आरोपीला चांगल्या वर्तणूकीच्या हमीपत्रावर सोडण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधिश ए.डी.लोखंडे यांनी दिले आहेत. हमीपत्रात नमुद अटी व शर्थीचा भंग केल्यास भा.द.वि. 353 नुसार शिक्षा भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शाकेर शहा शौकत शहा (30) रा. मिलींद नगर उस्मानपुरा औरंगाबाद असे आरोपीचे नाव आहे.

3 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी उस्मानपुरा पोलिस स्टेशनला संजयसिंग रतनसिंग डोभाळ ड्युटीवर होते. त्यावेळी मिलींदनगर भागातील रहिवासी तालेब शहा इब्राहीम शहा आणि फेरोज शहा असे दोघे जण तेथे आले. जावई शाकेर शहा आपल्याकडे आला असून आमहत्या करण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नीला सोबत पाठवले नाही तर स्वत:चा गळा कापून आत्महत्या करणार असल्याची धमकी देणा-या जावयाविरुद्ध पोलिस स्टेशनला आलेल्या दोघांनी तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिस स्टेशन डायरीला तशी नोंद घेण्यात आली.

पोलिस कर्मचारी संजयसिंग डोभाळ व त्यांचे सहकारी मिलिंदनगर येथील तालेब शहा यांच्या घरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी जावई शाकेर शहा याच्या हातात काचेचा तुकडा होता. माझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवा अन्यथा मी येथेच आत्महत्या करेन अशी बडबड तो करत होता. फिर्यादीसोबतच्या सहका-यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने हातातील काचेचा तुकडा स्वत:च्या पोटात मारुन घेण्याचा प्रयत्न केला. आलेल्या पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातील काचेचा तुकडा हिसकावला. दरम्यान आरोपीने फिर्यादी पोलिसाचा गळा दाबून धक्काबुक्की केली. या घटनेप्रकरणी उस्मानपुरा पोलिसात आरोपी शाकेर शहा याच्याविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल, सरकारी वकील अ‍ॅड. ए.बी. ऐगावकर आदींनी पाच साक्षीदारांचे जबाब सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी शाकेर शहा याला दोषी ठरवत चांगल्या वर्तणूकीच्या हमीपत्रावर अटीशर्थीवर सुटका करण्याचे आदेश दिले. अटी शर्थीचा भंग केल्यास भा.द.वि. 353 नुसार शिक्षा भोगावी लागणार असल्याचे न्या. ए.डी. लोखंडे यांनी निकालात म्हटले आहे. पैरवी अधिकारी जमादार बी. एस. हिवराळे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here