गुरुनानक तेल भंडारातील तेल तपासणीकामी जप्त

गोंदीया (अनमोल पटले) : गोंदीया शहरातील गुरुनानक तेल भंडार येथील तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीकामी जप्त केला आहे. या ठिकाणी वापरलेल्या तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दुकानाच्या आत बंद शटरमधे सुरु असलेल्या तेलाच्या पॅकींगवर छापा मारण्यात आला.

या ठिकाणी असलेल्या 80 तेलाचे डबे असा एकुण 3 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल तपासणीकामी जप्त करण्यात आला. दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभुमीवर तेलात भेसळीचे प्रमाण वाढले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरु आहेत. या दिवसात तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर सुरु असतांना अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे शहरात इतर तेल व्यावसायीकांमधे खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here