कार्यकर्त्यांनी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण करावे – ना. नवाब मलिक

गोंदीया (अनमोल पटले) : गोंदिया जिल्ह्याला खा. प्रफुल पटेल यांच्यासारखे मोठे नेतृत्व मिळाले असून हे गोंदीया जिल्हावासीयांचे भाग्य आहे. येथील शेतक-यांच्या धान्याचा प्रश्न, जलसिंचनाच्या सोयी, मेडीकल कॉलेज, बिरसी विमानतळ व अदानी प्रकल्प अशी विकासाची मोठी कामे खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने झाली आहे.

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पालकमंत्री नवाब मलीक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन रेलटोली येथे मोठ्या उत्साहात झाली. यावेळी गोंदीया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नवाब मलीक बोलत होते. पुढे बोलतांना पालकमंत्री मलीक म्हणाले की खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाचा लाभ कार्यकर्त्यानी घेतला पाहिजे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणूका म्हणजे जणू काही मिनी विधानसभा व लोकसभा निवडणुका असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण केले तर नक्की यश मिळेल. कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणूका जिंकता येतात. त्यासाठी पक्षात संघटनेची बांधणी व बुथ कमिटीचे सशक्तीकरण आवश्यक आहे.

या बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, खुशाल बोपचे, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, मनोज डोंगरे, कुंदन कटारे, डॉ.अविनाश जयस्वाल, रफिक खान, गणेश बरडे, अशोक सहारे आदींनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी सर्व तालुका अध्यक्षांकडून पक्षाची कार्यकारिणी, पक्ष संघटन, बुथ कमिटीचे सशक्तीकरण यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचा आढावा घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here