आ. डॉ. परिणय फुके कामगार आंदोलनात सहभागी

गोंदीया (अनमोल पटले) : एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याची गोष्ट करतात आणि दुसरीकडे एसटी कर्मचारी वैफल्यग्रस्त होत आत्महत्या करतात. आता तरी सरकार जागे होणार आहे की नाही? तुम्हाला जागे करण्यासाठी एसटी कर्मचारी अशा प्रकारे आत्महत्या करत असतील तर राज्यात आक्रोश उसळेल अशी गर्जना आ.डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.

विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपात सहभागी होत आ. डॉ. परिणय फुके बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी म्हटले की दिवाळी तोंडावर आली असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून पगार नाहीत. अत्यावश्यक सेवेत सामील असल्यामुळे कर्मचा-यांवर आंदोलन करण्यासाठी बंधने आली आहेत. दिवाळीत बोनस तर लांबची गोष्ट असून त्यांना पगार देखील मिळालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी म्हटले आहे.

यावेळी आ. फुके यांच्यासमवेत माजी खासदार शिशुपाल पटेल, नगराध्यक्ष तुमसर, प्रदिप पडोळे, उपाध्यक्ष मुन्नाजी फुंडे, काशिरामजी टेंभरे, सौ कल्याणीताई भुरे, सौ गिताताई कोंडेवार, योगराजजी टेंभरे, सचिन बोपचे, टेकलाल टेंभरे, आशिष पारधी, आशिष कुकडे, अरविंद पटले, श्यामजी धुर्वे, पंकज बालपांडे, राजाजी लांजेवार, मनोज डोये, पंकज भुते, डी.के.कुंभरे, आकाश अग्रवाल, मनोज मोटघरे, दिनेश चकोले, हितेंद्र मेश्राम, क्रिष्णकांत नेवारे, कपिल लांबट, सौ संध्याताई डोंगरवार, नितीन मते, महेश चवळे, सौ ममताताई डहारे, राहुल धुमनखेडे, निशिकांत मोटघरे हजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here