लोहपुरुष सरदार पटेल यांना रा.कॉ.च्या वतीने अभिवादन

गोंदीया (अनमोल पटले) : स्वंतत्र भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमीत्त रा.कॉ.पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करण्यात आला. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत त्यांच्या तैलचित्राला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, मनोहर वालदे, विनीत सहारे, भगत ठकरानी, दिपक पटेल, मयूर दरबार, सुनील भालेराव, रमन उके, गणेश डोये, नागो बन्सोड, सुनील पटले, शरद मिश्रा, हरबक्स गुरनानी, राज शुक्ला यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here