एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला आ. अग्रवाल यांचा पाठींबा

गोंदीया (अनमोल पटले) : एस.टी. महामंडळ कर्मचारी वर्गाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या उपोषण व आंदोलन स्थळी आ. विनोद अग्रवाल यांनी भेट दिली. कर्मचा-यांच्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या आहेत.

एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरन, 7 वा वेतन आयोग यासह इतर विविध मागण्यांसाठी कर्मचारी वर्गाचे आंदोलन सुरु आहे. या मागण्या सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करु असे आश्वासन आ. अग्रवाल यांनी यावेळी दिले.

अत्यंत कमी वेतनात चालक व वाहक नागरिकांसाठी दिवसरात्र झटत असतात. मात्र त्यांना तुटपुंज्या पगारात आपला चरितार्थ चालवावा लागत आहे. त्यांना कोणत्याही सोयी व भत्ते नियमीत व वेळेवर मिळत नसल्याची खंत आ. अग्रवाल यांनी व्यक्त केली. या अन्यायाला वाचा फोडण्यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी कथन केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here