जुगार अड्ड्यावर कारवाई

जळगाव : भुसावळ शहरातील नाहटा कॉलेज नजीक पाण्याच्या टाकीजवळ कल्याण मटका जुगारावर आज भुसावळ बाजार पेठ पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईत चालवणा-या दीपक जयकिसन चेलानी यास जुगार साहित्यासह रोख 560 रुपयांसह ताब्यात घेण्यात आले.

पो.नि.दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम-12 (अ)प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.

या कारवाईत स.पो.नि.संदीप परदेशी,अनिल मोरे पो.ना.रमण सुरळकर,रविद्र बि-हाडे, उमाकांत पाटील, पो.काॅ. विकास सातदिवे,प्रशांत परदेशी,ईश्वर भालेराव,कृष्णा देशमुख यांनी सहभाग घेतला.पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here