अनोळखी इसमाचा रेल्वेखाली मृत्यू

काल्पनिक चित्र

जळगाव : जळगाव शहरालगत शिव कॉलनी पुलाजवळ अप रेल्वे रुळावर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मयताची ओळख पटवण्याचे रामानंद नगर पोलिस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 4 नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीन वाजेपुर्वी सदर घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी उप स्टेशन प्रबंधक जळगाव यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनला खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

मयत इसमाचा चेहरा छिन्नविच्छीन्न झाला असून त्याचे वय अंदाजे 45 ते 50 या वयोगटातील आहे. मयताच्या अंगात निळी जिन्स पॅंट व पांढ-य रंगाचा नक्षी असलेला शर्ट आहे. याशिवाय अंगात पांढरा बनियन व तपकिरी रंगाची अंडरपॅंट आहे. घटनास्थळावर स्पार्क कंपनीची स्लिपर चप्पल व पांढरा हातरुमाल आढळून आला आहे. बांधा मजबूत असून रंग गोरा आहे. पोलिस नाईक जितेंद्र तायडे व पो.कॉ. इकबाल पिंजारी अकस्मात मृत्यूचा तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here