मुक्ताईनगर येथील चोरीप्रकरणी दोघांना अटक

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी दोघा गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहनसिंग जगदीशसिंग बावरी व सतविरसिंग बतमतसिंग टाक (दोघे रा. शिरसोली नाका तांबापुरा जळगाव ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

31 ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील नंदुरबारकर सराफ यांच्या ज्वेलरी दुकानात घरफोडी झाली होती. या घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (शिकलकरवाडा तांबापुर जळगाव) यास मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथून 6 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. दरम्यान 5 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी विनोद शिंदे यांच्या घरी चोरी झाली. या घटनेत एकुण 4 लाख 83 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता.

नंदुरबारकर सराफ यांच्याकडील चोरीप्रकरणी मोनुसिंग बावरी यास मुक्ताईनगर तालुक्यातून अटक करण्यात आली होती. त्याच परिसरात व त्याच कालावधीत कोथळी येथे विनोद शिंदे यांच्याकडे देखील चोरी झाली होती. त्या चोरीत अटकेतील मोनुसिंग बावरी व त्याच्या दोघा साथीदारांचा सहभाग असल्याचे पो.नि. प्रताप शिकारे यांना समजले. त्या माहितीच्या आधारे शिताफीने सापळा रचून मोनुसिंग बावरी याचा भाऊ मोहनसिंग जगदीशसिंग बावरी व सतविरसिंग टाक या दोघांना जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातून 8 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. या कारवाईत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. नितीन पाटील, पोलिस नाईक इमरान सैय्यद, सुधीर साळवे, पो.कॉ. किशोर पाटील, गोविंदा पाटील, सचिन पाटील आदींनी सहभाग घेतला. अटकेतील दोघा गुन्हेगारांना मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here