चाळीसगावनजीक आढळली बिबट्याची पिले

जळगाव : चाळीसगावनजीक वडगाव लांबे या गाव शिवारात बिबट्याची दोन पिले आढळून आली आहेत. उस तोड मजुरांच्या नजरेस ही दोन पिले पडल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती चाळीसगावच्या वन परिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांना दिली.

दोन दिवसांपुर्वी बिबट्याची दोन पिले मजुरांना आढळल्यानंतर वनविभागाने पाहणी केली असता एकच पिल्लू आढळून आले. एक पिल्लू मादीने सुरक्षीत स्थळी हलवल्याचे वन विभागाच्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाले आहे. त्यानंतर या परिसराला सुरक्षीत करण्यात आला असून त्यावर निगरानी ठेवली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here