पत्नीची हत्या करणा-या पतीला जन्मठेप

वाळूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची जाळून हत्या करणा-या पतीला वैजापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 17 मे 2017 रोजी संगीता प्रभाकर लोखंडे (रा. गांधीनगर, रांजणगाव) या विवाहितेच्या चारित्र्यावर तिचा पती आरोपी प्रभाकर गंगाधर लोखंडे याने संशय घेत तिला जाळून टाकले होते. गंभीर अवस्थेतील जखमी संगीतावर वैद्यकीय उपचार सुरु असतांना तिचे निधन झाले होते. जखमी अवस्थेतील संगीताच्या फिर्यादीनुसार सुरुवातीला या प्रकरणी भा.द.वि. 307 नुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिचे निधन झाल्यानंतर पतीविरुद्ध खूनाचे 302 हे कलम वाढवण्यात आले

मयत संगीताचा पती प्रभाकर याच्याविरुद्ध वैजापूर न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्या. मोहियोद्दीन एम. ए. यांच्या न्यायालयात आरोपी प्रभाकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील अ‍ॅड. एन. एस. जगताप यांनी कामकाज पाहिले. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवीकामी संघराज दाभाडे यांनी मदत केली. आरोपी प्रभाकर लोखंडे यास दोषी ठरवत न्यायालयाने 10 नोव्हेंबर 2021 रोजी आजीवन कारावासाची शिक्षा, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद, कलम 498 -अ नुसार तिन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here