तिरोडा शहर व ग्रामीण रा.कॉ.सभा संपन्न

गोंदीया (अनमोल पटले) : आगामी काळातील निवडणूकीत  युवकांना रा.कॉ. पक्ष योग्य पद्धतीने प्रतिनिधीत्व देणार आहे. परिवर्तनाची सुरुवात ख-या अर्थाने तरुणांपासून होते. तिरोडा शहर व ग्रामीण रा.कॉ. युवक काँग्रेस पक्षाची सभा येथील गजानन महाराज मंदिरात माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन बोलत होते.

पुढे बोलतांना जैन म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महत्वाची आहे. जिल्ह्याच्या विकासकामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी साथ द्यावी. वाढत्या महागाईला जबाबदार भाजपला आगामी निवडणूकीत आपली जागा दाखवून द्या. या कार्यक्रमाला माजी आमदार राजेन्द्र जैन, देवेन्द्रनाथ चौबे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तालुका अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेंद्र भगत, जिल्हा युवक अध्यक्ष केतन तुरकर, के. के. पंचबुधे, बोधानंद गुरुजी, माजी पंचायत समिती सभापती नीताताई रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले,माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती वाय. टी. कटरे, डॉ. संदीप मेश्राम, माजी पंचायत समिती उपसभापती डॉ. किशोर पारधी, राजेन्द्र ठाकरे, बालू बावनथड़े, नितेश खोब्रागडे याच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here