गोंदीयात राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का

गोंदीया (अनमोल पटले) : गोंदीया येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

विजय शिवणकर हे राज्याचे माजी वित्तमंत्री महादेव शिवणकर यांचे पुत्र असून गोंदीया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. विजय शिवणकर यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली असतांना या राजीनाम्याचे काय पडसाद उमटतात हे लवकरच बघायला मिळणार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here