बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष शिक्षा

जळगाव : सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एकत्रीत रक्कम रुपये 35 हजार दंड सुनावण्यात आला आहे.

दिनांक 7 मार्च 2018 रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (22) पाचोरा या गावातील श्रीराम नगर, सिंधी कॉलनी पाचोरा, ता. पाचोरा याने पिडीत बालिकेला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलुन त्याच्या घरात घेवून गेला. तिच्या अंगावरील कपडे काढून आरोपीने तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याबाबतची फिर्याद पिडीतेच्या आईने पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल केली. त्या नुसार पाचोरा पोलिस स्टेशनला गु.र.न. 28/18 भा.द.वि. कलम 376, 323, 354, 511, 504, 506 आणि बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 चे कलम 7 व 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ADV. KETAN DHAKE

जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन, माने (गाडेकर) यांच्या न्यायालयासमोर सदर खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारपक्षाच्या वतीने एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात 7 वर्षांची पिडीता, तिची आई, तपासी अंमलदार व डॉक्टर आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तपासी पोलिस अधिकारी दत्तात्रय नलावडे यांनी योग्य प्रकारे तपासाचे काम केल्यामुळे तसेच सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

भा.दं.वि. कलम 376(2) (एफ) (आय), 354-अ, 354-ब आणि बाल लैंगीक अत्याचार अधिनियम लै.अ.प्र.अधिनियम 2012 चे कलम 3 व 4 प्रमाणे दोषी धरुन शिक्षा सुनावण्यात आली. भा.द.वि. कलम 376(2)(एफ)(आय) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 चे कलम 3 व 4 साठी दहा वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व रुपये 25 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भा.द.वि. कलम 354-अ साठी दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भा.द.वि. कलम 354-ब साठी तिन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता केतन जे. ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. सात वर्ष वयाच्या बालिकेसोबत केलेले हे कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे असल्याचा युक्तिवाद खटल्याच्या वेळी करण्यात आला. न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपी भैय्या भरत गायकवाड यास दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. विजय गोरखनाथ पाटील यांनी सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here