खांबावरील महावितरणच्या इलेक्ट्रीक तारा चोरीला

जळगाव : जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात सामनेर रस्त्यावरील विजेच्या खांबावरील सुमारे शंभर फुट वायरी चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. इलेक्ट्रिक फ्युज काढून चोरट्यांनी चक्क वायरी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी अगोदर फ्युज काढून घेतल्यामुळे परिसरातील विज प्रवाह खंडीत झाला होता. तांत्रीक बिघाड झाल्याचा ग्रामंस्थांचा सुरुवातीला समज झाला. मात्र विज प्रवाह खंडीत झाल्याच्या तक्रारीनंतर म्हसावद सेक्शन येथील सिनीयर टेक्निशियन अकिल मेवानी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर चोरीचा खरा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी आता आपला मोर्चा चक्क रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवरील विजेच्या तारांकडे वळवला आहे. चोरट्यांच्या या चोरीमुळे विज ग्राहकांना मात्र अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सुमारे 35 हजार रुपयांच्या विज तारांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here