खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसाचे अनधिकृत बॅनर हटवले

sanjay raut

जळगाव : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमीत्त जळगाव शहरात लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर आज हटवण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांच्या सततच्या पाठपुराव्याचे हे फलीत असल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप ते लालबहादुर शास्त्री टॉवर चौकापर्यंतच्या रस्त्यात दुभाजकाच्या जागोजागी विस बॅनर लावण्यात आले होते. ते सर्व बॅनर बांधकाम व हॉटेल व्यावसायीक खुबचंद साहित्या यांच्या प्रायोजकत्वाखाली लावण्यात आले होते. त्याबाबत शहर पोलिसांनी खात्री करुन घेतली. महानगर पालिकेतून या बॅनरची परवानगी घेतली नसल्याची देखील पोलिस विभागाकडून खात्री करण्यात आली होती. सदर बॅनर हे अनधिकृत असल्याची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी पोलिस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील अनधिकृत होर्डींग्ज बाबत माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी सतत आवाज उचलला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here