आ. अग्रवाल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण-भूमीपूजन

गोंदिया (अनमोल पटले) : महादेवाच्या आशीर्वादाने आपण जनतेने मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले आहे. आपण सर्वांनी जो आशीर्वाद मला दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. अंतिम श्वासापर्यंत मी आपली सेवा करत राहणार असल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी म्हटले. ग्राम नागरा येथील 1 कोटी 19 लक्ष रुपयांच्या विविध भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर ग्राम नागराचे सरपंच धनलाल नागपुरे, भाऊराव ऊके, पूर्व जिप सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, पन्नालाल मचाडे, उपसरपंच नरेश नागरिकर, टिटूलाल लिल्हारे, मेहतर पगरवार, भिकराम लिल्हारे, मोहन गौतम, गर्राचे सरपंच कुलदीप पटले, सुरेश लिल्हारे, मदनलाल चिखलोंडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. विनोद अग्रवाल म्हणाले की, नागराधाम येथे ज्या गरजू नागरिकांना निवासस्थान मिळायला हवे त्यांचे नाव यादीतून काढून टाकण्यात आले आहे. या विषयावर मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिह यांची भेट घेऊन त्या गरजूंना निवास मिळण्याची विनंती केली आहे. त्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरु आहे.

नागरा पर्यटन स्थळाला चालना देण्यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यांच्या कामांची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देखील आठ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. नागराच्या पेयजल पुर्ती तसेच नागरा- कटंगी पांदन रस्त्याचे खडीकरण करणे, बालाघाट रोड ते बायपास रस्त्याबाबत बैठकीचे आयोजन करून कार्याला गती देण्यात येणार आहे. नागराधाम शेड ला सुशोभित करण्याच्या कामासह स्मशानभूमीची समस्या मार्गी लावली जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here