वॉरंट बजावणीत अडथळा – तीन वर्ष सक्तमजुरी

अहमदनगर : न्यायालयीन वॉरंट बजावणीकामी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणा-यास तीन वर्ष सक्तमजुरीसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एन. राव यांनी सुनावली आहे. देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट आरोपीला बजावण्याकामी 27 नोव्हेंबर 2016 रोजी पो.कॉ. शरद देविदास गावडे, रत्नपारखी व शिंदे असे तिघे जण ढवळीपुरी (ता. पारनेर) येथे गेले होते. त्यावेळी वॉरंटमधील आरोपी मारुती सखाराम गावडे यांचा मुलगा समोर आला. पोलिस कर्मचारी शरद गावडे यांना त्याने सांगितले की वॉरंटमधील आरोपी हे माझे वडील असून, ते यावेळी पुणे येथे वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्याचवेळी शेजारच्या घरातून आलेल्या व्यक्‍तीने आरडाओरड करत पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणला. त्याने वॉरंट हिसकावत फाडून टाकले. किसन केशव भुसारी यानेदेखील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामात शिवीगाळ व दमदाटी करत अडथळा आणला.

पारनेर पोलिस स्टेशनला या घटनेप्रकराणी आरोपी देवराम गावडे व किसन भुसारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल नोंद करण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने या खटल्याच्या कामकाजाच्या वेळी पाच साक्षीदार तपासले गेले. पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत आरोपी देवराम गावडे यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्‍तमजुरीसह 6 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. दंड भरला नाही तर तीन महिने सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मोहन कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला. स.पो.नि. ए. के. भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाजात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here