मुद्देमालासह मोबाईल चोरट्यांना अटक

जळगाव : रस्त्याने जाणा-या महिलेस धडक देत मोबाईल घेऊन पलायन करणा-या तिघांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 59 हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून तो फिर्यादीस परत करण्यात आला.

17 ऑक्टोबर 2021 रोजी पूजा दिलीप भावसार (रा.अशोक बेकरी जवळ जळगाव) या बजरंग पुलाजवळून त्यांचे घरी जात होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना संगनमताने धडक मारली. या धडकेत त्या खाली पडल्या होत्या. खाली पडल्यानंतर त्यांचा मोबाईल घेत चोरटे पळून गेले.

या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला 450/2021 भा.द.वि. 279, 379, 337, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलिसांनी तिघे आरोपी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने तो मोबाईल फिर्यादीस परत करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here