रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाचा मार्ग झाला सोपा

रेल्वेने प्रवास करण्याआसाठी कन्फर्म तिकीट हा एक महत्वाचा घटक असतो. कन्फर्म तिकिटासाठी प्रवासी कित्येक दिवस आधीपासून आरक्षित जागा मिळण्यासाठी तिकीट काढण्याची लगबग करत असतात. मात्र आता कन्फर्म तिकिटासाठी आपल्याला सर्वच गाड्यांचा शोध घेण्याची आवश्यकता नाही.

आपण प्रवासासाठी जात असलेल्या मार्गावर जर एखाद्या गाडीत सीट उपलब्ध असल्यास त्याचा संदेश आपल्या मोबाईलवर येईल. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची खात्री होईल. आयआरसीटीसीने पुशअप नावाने नवीन सुविधा सुरु केली आहे. सद्यस्थितीत चार्ट तयार होण्यापूर्वी सीट उपलब्ध असल्याचा मेसेज मोबाईलवर पाठवला जात आहे.

आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी प्रवाशांनी पुश अप नोटिफिकेशनसाठी आपला मोबाईल क्रमांक नोंद करायचा आहे. नोंदणी केलेल्या मोबाईलवरच सीट उपलब्ध असल्याचा संदेश पाठवला जाईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारणी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here