व्हाटसअ‍ॅप गृपवर आक्षेपार्ह फोटो प्रकल्प अधिकारी अखेर निलंबीत

बीड : महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने कार्यालयीन कामकाजाच्या व्हाटसअ‍ॅप गृपवर स्वत:चा आक्षेपार्ह फोटो अपलोड करत व्हायरल केला होता. महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर तो फोटो व्हायरल करणारा प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याचे अखेर निलंबन झाले आहे. बिड शहर व जिल्हयात या घटनेच्या माध्यमातून समाजात व महिला वर्गात तिव्र स्वरुपाचा रोष व्यक्त करण्यात आला होता. 

महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये तर संतापाची लाट आली होती. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या आक्षेपार्ह फोटो प्रकरणाची गंभीर दखल घेतली. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्या तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. यापुर्वी देखील या अधिका-याच्या विरोधात महिला अधिका-यासमवेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here