हल्लेखोरांपैकी तीन सेना पदाधिकारी – अँड. रोहिणी खडसे यांचा आरोप

जळगाव : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप भाजपचे माजी महसूल मंत्री आणि रा.कॉ.चे  विद्यमान नेते एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केला आहे.  मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथून एक कार्यक्रम आटोपून रोहिणी खडसे या सोमवारी रात्री परत येत असतांना त्यांच्या कारवर समोरुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले असून जीवित हानी टळली आहे. सदर हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.

तीन दुचाकीवरून एकुण सात जण आपल्या दिशेने चाल करुन आले होते. सात पैकी तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे अँड. खडसे यांनी म्हटले आहे. एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता असेही त्यांनी म्हटले आहे. आपण बंद कार मध्ये बसले असतांना आपल्या दिशेने आलेल्या तिघांपैकी एकाने आपल्यावर  पिस्तूल रोखत कारचा दरवाजा उघडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र आपण दरवाजा उघडला नाही. त्यामुळे चिडलेल्या व हातात रॉड असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्या दिशेने जीवघेणा हल्ला चढवला. आपणास जीवे ठार करण्यासाठी तिघे आले होते, असा आरोप अँड. रोहिणी खडसे यांनी केला आहे.

आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम त्यांनी माध्यमांसमोर कथन केला. यावेळी त्यांचे पिताश्री एकनाथराव खडसे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत हल्लेखोरांची नावे सांगतांना शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई यांच्यावर त्यांनी हल्ल्याचा आरोप केला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here